गोंदिया,03- गोंदिया येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) येथील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अभियंता अशोक राऊतला कंत्राटदाराचे खड्डे बुजविण्याच्या कामाचे देयके तयार करून मोजमाप पुस्तिका वरिष्ठाकडे सादर करण्यासाठी दीड लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. परंतु, सदर कंत्राटदाराला रक्कम द्यायची इच्छा नसल्याने गोंदिया येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे आज 3 ऑक्टोबरला सापळा रचण्यात आला. त्या दरम्यान राऊत यांनी दीड लाख रुपयाची मागणी करीत रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावरून त्यांच्याविरुद्ध देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कंत्राटदार यांनी 2015 मध्ये सिद्धार्थ मडूर सहकारी संस्था देवरी व नवयुवक मजूर कामगार सहकारी संस्था रौंढा (ता. सालेकसा) यांनी डांबरी रस्ते भरून देण्यासाठी अधिकार पत्र दिले होते. यावर देवरी उपविभागातील तत्कालीन अभियंता अशोक राऊत यांना संपर्क करून कामाच्या मोजमाप पुस्तिकेची नोंद करण्याची विनंती करून बील काढण्यास सांगितले होते. यावर दोन्ही कामासाठी दीड लाख रुपयाची लाचेची मागणी राऊत यांनी केली होती. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment