Friday, 6 October 2017

नानांचा डिसेंबर अखेर भाजपला ‘बाय-बाय’ ?

Photo No. 4खेमेंद्र कटरे ,गोंदिया,दि. ४ – गेल्या काही महिन्यापासून सतत प्रकाश झोतात असलेले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नानाभाऊ पटोले यांचा भाजपमधील प्रवास हा अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र चांगल्याच रंगल्या आहेत. नानाभाऊंनी आपल्याच सरकारवर उठवलेली टीकेची झोड काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपने सुद्धा पटोले यांना अंधाèया कोपèयात उभे केल्याचे दिसत आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत भाजपने घेतलेली भूमिका हीच नानांच्या लागू केली आहे. याशिवाय पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या बैठकीला दांड्या मारत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी, नानाभाऊंचा भाजपमधील राजकीय प्रवास हा आता अंतिम टप्प्यात पोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते नानाभाऊसाठी हे वर्ष भाजपनेते म्हणून अखेरचे ठरण्याची शक्यता आहे.

आपण एकीकडे ओबीसीसाठी लढतोय हे नानाभाऊ सांगतात. परंतु, ओबीसींच्या नेत्याशीच नानाभाऊंचे अद्यापही पाहिजे तसे सूत जुळले नाहीत. नानाभाऊंनी ओबीसींच्या नेत्यांना एका मंचावर आणण्यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही. जे ओबीसी संघटनांच्या माध्यमातून आले, त्यांच्याशीही आपण जुळवून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. नानाभाऊंनी याचे qचतन केले असते तर आज ओबीसींची राजकीय ताकद वेगळी दिसली असती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करून बंडाचे निशाण फडकवणारे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या पक्षविरोधी कारवायांकडे तूर्तास दुर्लक्ष करण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. १६ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर विपरीत परिणाम पडू नये, याची खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. त्यातही गेल्या दिवाळीच्या वेळी श्री. पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत ज्या हिमतीने राजेंद्र जैन यांना हरविण्यासाठी कंबर कसून परिणय फुकेंसाठी अहोरात्र काम केले, त्याच परिणय फुके यांनी आज नानाभाऊंना वाळीत टाकले आहे. नानाभाऊंच्या पक्षातील विरोधकांनी नानांनी पक्ष सोडावा, याकरिता आधीपासूनच तशी फिल्डींग लावली आहे. खासदार पटोलेंसाठी यावर्षीचा डिसेंबर हा महिना अखेरचा ठरू शकतो. जर हिवाळी अधिवेशनापूर्वी नानांनी राजीनामा दिला तर लोकसभेसाठी मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. असे घडले तर प्रफुल पटेल यांना टक्कर देण्याची क्षमता असणाèया तुल्यबळ नेत्यालाच स्पर्धेत उतरविणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपकडे असा नेता उपलब्ध आधीपासून गुडघ्याला बाqशग बांधून तयार आहे. नागपूर दरबारी सुद्धा त्या नेत्याचे वजन आहे.
तसेही नानाभाऊंचा राजकीय इतिहास बघितल्यास भाऊ कधीही कुठेही स्थायी झाले नाहीत. त्यांची सुरवात ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून अपक्ष म्हणूनच झाली आहे. नानाभाऊंनी अपक्ष म्हणूनच विधानसभेत प्रवेश केला. लोकसभेची लढाईसुद्धा त्यांनी अपक्ष म्हणूनच सुरू केली. यामुळे आता जर भाजपला रामराम ठोकलाच तर नानाभाऊ एक तर काँग्रेसप्रवेश करणार qकवा स्वतःचा नवा राजकीय पक्ष तयार करणार, हे जवळपास निश्चित आहे. नानाभाऊ स्वतःची ओळख ओबीसींचा नेता म्हणून सांगत असले तरी ओबीसींच्या एकाही मुद्याला त्यांनी कधीही धार देण्याचा प्रयत्न केला नाही, हे वास्तव आहे. नानाभाऊ ओबीसीचे नेते म्हणून शासन दरबारी आवाज उठवतात, हे जरी खरे असले तरी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरल्याचे वा एखादे आंदोलन केल्याचे उदाहरण नाही. ओबीसींच्या नावावर जी ओबीसी छावा संग्राम परिषद स्थापन केली होती, आज ती ओबीसी छावा संग्राम परिषद साधी औषधालाही शिल्लक नाही. फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय असणारी ओबीसी छावा संग्राम परिषद ही सातत्य टिकविण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. शेतकèयांच्या मुद्यांवर नानांवर बेगडी भूमिका घेतल्याचा आरोप होतो आहे. तीन वर्षे नानांनी या प्रश्नावर मौन धारण केले होते. आता अचानक नानाभाऊंना शेतकरीहित कसे काय आठवले असा सवाल उभा ठाकला आहे. संसदेत ओबीसी व शेतकरीविषयी तुम्ही आवाज उठविला हे खरे आहे. परंतु, त्या दोन्ही विषयी आपली धार टिकवून ठेवण्यात नानाभाऊ व त्यांच्या संघटनांनी सातत्य राखले नाही, हेही तितकेच खरे आहे.
नानाभाऊंनी प्रफुल पटेलांना अडीच लाखाचे मताधिक्य घेऊन चांगलीच धूळ चारली होती. तो विजय नानांसाठी नक्कीच अविस्मरणीय असाच आहे. परंतु, पटेलांना आपण हरवलो म्हणून मंत्रिपद मिळेल, ही अपेक्षा ठेवण्यात मात्र नानांचा गणित कुठेतरी चुकला. qकबहुना, नानांना तशा गणिताची जुळवाजुळव करायला लावणाèया गैरओबीसींनी त्यांच्या चक्रव्यूहात शिताफीने अडकविले. ज्यांच्यावर नानांनी विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला. त्याचे कारणही तसेच आहे. प्रफुल पटेलांना तर त्यांच्या जीवनातील पहिल्याच विधानसभा निवडणुकीत डॉ.खुशाल बोपचे यांनी तर लोकसभेच्या निवडणुकीत शिशुपाल पटले यांनी त्यांच्या पराभव केला होता. फरक एवढाच की त्यांनी ज्यावेळी पराभव केला, त्यावेळी कुठेही भाजपचे सरकार नव्हते. मात्र, तुमच्यावेळी सरकार सत्तेत असल्याने विदर्भातील ओबीसीसाठी झटणारा शेतकरीपुत्र म्हणून न्याय द्यायला हवा होता. परंतु, ज्या गडकरी व फडणवीसांचे हात धरून तुम्ही गेलात त्यांनाच तुम्हाला मंत्रिपद द्यायचे नव्हते, हे मात्र तुम्ही मनापासून स्वीकारायला पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्यांना उमेदवारी मिळवून देता ती व्यक्ती मंत्री होते हा कुठेतरी वाड्यावरील व बागेतील सभांषणाचाच असर नव्हे कायŸ?

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...