Saturday 21 October 2017

पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू



देवरी,दि.21: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ते उपविभागीय पोलीस कार्यालय देवरी (गोंदिया) येथे गुप्तचर विभागात कार्यरत होते. ही घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरूवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास निमगाव नाल्यातील बंधाºयात घडली.

20bhph28_20171022036रविंद्र हा दिवाळीनिमित्ताने आई-वडिलाकडे मेंगापूर येथे कुटुंबासह आला होता. मित्रांसोबत चर्चा करीत नित्याप्रमाणे पोहण्याचा बेत ठरला. त्याच्यासोबत मित्र चेतन भिमराव काळे (३५), व शिक्षक मनिष पांडूरंग खंडाईत (३३) सोबतीला होते. तिघांनाही पोहचण्याची कला अवगत नव्हती. टयुबच्या साहायाने पोहायचे. घटनेच्या दिवशी वेळी पोहत असताना रविंद्रचा टयुब निसटल्याने तो जोर जोराने ओरडू लागला. क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्याकरिता टयुब त्याच्याकडे फेकला व स्वत:ही आटोकात दोन्ही मित्रांनी प्रयत्न केले. मात्र रविंद्र खोल पाण्यात बुडाला. यातच त्याचा मृत्यू झाला. भ्रमणध्वनीने घटनेची माहिती मंगेश खंडाईत याला दिली. गोताखोरांना डोहातून रविंद्रचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. रविंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, व बहिण असा आप्त परिवार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...