नागपूर,दि.22:येथील कुणबी महासंघातर्फे शुक्रवारला( दि.२०) बळीराजा गौरवदीन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमाप्रंसगी बोलतांना बळीराजा दानशूर होता त्यांचा न्याय हा सर्वांसाठी सारखा होता, बळीराज्याचे राज्य हे शेतकऱ्यांचे राज्य होते.त्याची जोपासना करत कुणबी समाजातील प्रत्येयक घटकाने हा दिवस बळीराजा गुणगौरव म्हणून साजरा करावा.२०१८ मध्ये कुणबी महासंघाच्या माध्यमातून हा उपक्रम पूर्ण शहरभर साजरा करू असे आश्वाशन भाजप शहर अध्यक्ष आ. सुधाकरराव कोहळे यांनी दिले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपूर भाजपा शहर अध्यक्ष सुधाकरराव कोहळे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक डॉ.बबनराव तायवाडे, विरोधी पक्षनेते तानाजी वणवे म.न.पा. नागपूर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शकील पटेल,श्रीकांत आगलावे,जिल्हा सचिव पंकज पांडे,कार्याध्यक्ष राजू खडसे,जिल्हाध्यक्ष जगदीश पंचबुधे,कोषाध्यक्ष आकाश जावळे,वरिष्ठ प्रशांत रिंके,तरुण देशमुख,पराग वानखडे उपस्थित होते.यावेळी बोलतांना बळीराजाचे राज्य हे समतेचे ,सर्वांगीण विकासाचे,शेतकर्यांचे राज्य होते त्यांचा बोध घेऊन तरुणांसोबत आदर्श ठेवत भविष्यात मोठ्या पातळीवर कार्यक्रम नागपूर शहर अंतर्गत राबवू असे तारुण्य ऊर्जा देणारे मत विरोधीपक्ष नेते तानाजी वणवे मनपा नागपूर यांनी व्यक्त केले.
इडा पिडा जाऊदे,बळीराजाचे राज्य येऊ दे असे जाहीर घोषणा करत डॉ.बबनराव तायवाडे यांनी बळीराजाला वंदन केले. व बळी राजासारखे निस्वार्थी जनतेची सेवा करावी त्यांचा आदर्श घ्यावा जनहिताचे लौकिक मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.संचालन शरद वानखडे यांनी करीत कुणबी महासंघाची रूपरेषा व्यक्त केली.
हरी तू निष्ठुर निर्गुण|नाही माया बहू कठीण | नव्हे ते करिसी आन| कवणें नाही केले ते|| बळी सर्वस्वे उदार | जेणें उभारिला कर | करुनि काहार | तो पातळी घातला ||
संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणीतून बळीराजा हा दानशूर असून त्याने सर्वांचा उद्धार केला, परंतु त्यांचा काहार करून पाताळी घालण्यात आले या खऱ्या इतिहासावर प्रकाश टाकत सचिव पंकज पांडे यांनी आभार मानले. उजवला महल्ले,अनघा वानखेडे, धनश्री गोमासे,रवींद्र काहाते, शुभम वाघमारे,अभिषेक राऊत,प्रकाश रोकडे,संजय पन्नासे,राकेश तिडके,लाभेश ढोक यांचा तर्फे प्रसाद वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment