Tuesday, 3 October 2017

पोलीस पतीकडून वकील पत्नीची जाळून हत्या

नागपूर,दि.02 : पोलीस असलेल्या पतीने अत्यंत चलाखीने राहत्या घरात वकील पत्नीची जाळून हत्या केली. घरघुती भांडणात तिने स्वतःला जाळून घेतले. आणि तिला वाचवताना आपणही भाजल्याचा बनाव केला. पोलीस विभागानेही सुरुवातीला आपल्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवला. मात्र, सात आणि तीन वर्षीय चिमुकल्यांनी आई-वडिलांमध्ये त्या रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.वकील असलेल्या वैशाली नागमोते 28 सप्टेंबर रोजी वाडी परिसरातील राहत्या घरी 90 भाजल्या गेल्या. गंभीररित्या भाजल्या गेल्यामुळे 30 सप्टेंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घरघुती भांडणात पत्नी वैशालीने स्वतःला जाळून घेतल्याचा दावा तिचा पोलीस पती देवेंद्र नागमोतेने (वाहतूक पोलीस शिपाई) केला.त्या घटनेत देवेंद्रही 40 टक्के भाजला गेल्यामुळे पत्नीला वाचवताना तो भाजला गेल्याचे सर्वांना वाटले. मात्र वैशालीच्या 7 वर्षीय मुलीने पोलिसांना हकीकत सांगितली. त्यानंतर देवेंद्रचा खरा चेहरा जगासमोर आला. रोज दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील आईला जबर मारहाण करायचे. त्या दिवशी वडिलांनीच आईला रॉकेल टाकून जाळले, असा दावा सात वर्षीय मुलीने केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...