Saturday, 28 October 2017

वांढरा येथे पशू वंधत्व निवारण शिबीर संपन्न

देवरी,28- देवरी पंचायत समितीच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यातील वांढरा येथे पशूधन वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन आज शनिवारी (ता.28) करण्यात आले होते.
या शिबीराचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर हे होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी संतोष पांडे, पशूधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, सरपंच सुरेश बारई, संदीप ठलाल, मोतीलाल पिहिदे, अशोक शहारे, कुलदीप लांजेवार, ग्रामसेवक संजय कढव आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीराची सुरवात गोधनाचे पूजन करून करण्यात आले. दरम्यान, उपस्थित पशूपालकांना पशूधन विकास अधिकारी डॉ. कोळेकर यांनी पशूधन, पशूसंवर्धन, जनावरांची टॅगिंगआदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी गाईम्हशींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.  यामध्ये वंधत्व तपासणी-26, जंतनिर्मूलन-42, औषधोपचार-23, टॅगिंग-35 याप्रमाणे जनावरांची तपासणी करण्यात आली.  संचालन डॉ.रोहीणी साळवे, तर आभार प्रदर्शन सचिव संजय कढव यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वितेसाठी कृषी तांत्रिक संजय डोये, स्वच्छता मिशनचे पारधी, रोजगार सेवत तिरगम, ग्राम पंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...