लाखनी, दि.२६-: :राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी प्रवर्गातील १०३ जातींना क्रिमीलेयर तत्वातून वगळल्याचे वृत असून त्यामध्ये कुणबी,पोवार,भोयर-पवार,पवार,तेली,कोहळी आदी जातींचा उल्लेख नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सरकारने ओबीसीमध्ये अशाप्रकारे भांडण न लावता ओबीसी प्रवर्गावर असैवंधानिक लादलेली क्रीमीलेयरची अटच काममस्वरुपी रद्द करावी अशा मागणीचे निवेदन ओबीसी सेवा संघ लाखनी शाखेने माननीय तहसीलदार लाखनी यांच्यामार्फेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघ शाखा लाखनीचे अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, उपाध्यक्ष अशोक गायधने, विलास लांजेवार, सचिव गोपाल नाकाडे, कोषाध्यक्ष संजय वनवे, पुरुषोत्तम झोडे, सन्तोष सिंगणजुडे, मंगेश धांडे, खुशाल गिदमारे, नंदलाल कडगाये, गोपीचंद फेंडर, अनिल शेंडे, सुभाष गरपडे, जवाहर मुंगुसमारे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुणबी,पोवार,तेली,भोयर-पवार,पवार,कोहळी,सोनार आदी समाज पूर्वीपासून शेतीशी जुळलेला आहे. त्यामुळे समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. शेती आणि शेतमजुरी हा पूर्वेपार चालत आलेला या सर्व समाजाचा व्यवसाय आहे. कोणत्याही संदर्भाने महाराष्ट्रातील ओबीसीतील हे समाज संपन्न किंवा वैभवशाली नाही. त्यामुळे मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी,पोवार,भोयर-पवार,तेली,माळी,कोहळी,सोनार,कलार आदी जात समूहासह इतर सर्व जातीसमूहाला क्रिमीलेअर अट शिथिल करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
No comments:
Post a Comment