Sunday 1 October 2017

KBC 9 ला मिळाली पहिली महिला ‘करोडपती


007_1506760545
जमशेदपुर,दि.01(वृत्तसंस्था) – केबीसी सीजन-9 ला आपला पहिला करोडपती मिळाला आहे. जमशेदपूरच्या अनामिका मजूमदार या सीजनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. अनामिका यांनी 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर 7 कोटींच्या प्रश्नासाठी सुद्धा क्वालिफाय केले. मात्र, त्यांनी जॅकपॉट प्रश्नाकडे जाण्यापूर्वी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला आहे. अनामिका रविवारी संध्याकाळी मुंबईहून जमशेदपूरला पोहोचणार आहेत. अनामिका मजूमदार दोन मुलांच्या आई आहेत. त्या जमशेदपूरच्या साकची येथील न्यु बाराद्वारी येथे राहतात. सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अनामिका ‘फेथ इन इंडिया’ नावाचे एनजीओ चालवतात. केबीसी 9 मध्ये जिंकलेली 1 कोटींची रक्कम झारखंडच्या ग्रामीण भागातील सेवेत लावणार असे त्यांनी सांगितले आहे. एनजीओ स्थापित करण्यापूर्वी सुद्धा त्या नेहमीच गरीब लहान मुलांच्या मदतीसाठी तत्पर होत्या. त्यांना डान्सची आवड आहे.  आपल्या घराजवळ राहणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना सुद्धा त्या डान्स शिकवतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या मुलांसोबत एक नाटक सुद्धा सादर केले होते. कॅशलेस इंडियावर आधारित या नाटकाचे सर्वत्र कौतुक झाले होते. नदीच्या काठावर आयोजित झालेल्या त्या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही उपस्थिती लावली. मुंबईतील गोरेगाव येथे गुरुवारी झालेल्या केबीसी – 9 च्या शोमध्ये त्या 7 कोटींच्या जॅकपॉट प्रश्नापर्यंत पोहोचल्या.यापूर्वी याच सीजनच्या एका एपीसोडमध्ये हरियाणाचे वीरेश चौधरी यांनी 50 लाख रुपये जिंकले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...