यवतमाळ,दि.10 -येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांकडून शासन विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवाच्या नावाच्या फलकाची गाढवावरून धिंड काढण्यात आली.यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदारांचे शासनाकडे १०० कोटीची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची दिवाळी अंधारात असून या प्रलंबित देयकेबाबत सरकारने निर्णय न घेतल्याने जिल्ह्यात कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात टेंडर न भरण्याचे आंदोलन सुरू असून या बाबत आज कंत्राटदारांनी अनोखे आंदोलन केले. आपल्या कामाचे ट्रक, जेसीबी, मशनरी आणि आपली सर्व मालमत्ता साहित्य घेऊन सरकारला स्वाधीन करण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिष सिंग यांच्या कडून बैठकित कंत्राटदारांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांचा नावाचा फलक गाढवावर ठेवून धिंड काढण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment