गोंदिया,दि.०७- गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागार्तंगत येत असलेल्या काटी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्वाचे केंद्र असून या आरोग्य केंद्रात जवळपास १००-१५० रुग्णांची ओपीडी दररोज असते.सकाळी ९ वाजता रुग्णालयात तपासणीला सुरवात होते.परंतु कधीकधी डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागतो.या आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी यांच्यासाठी निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे.परंतु येथील डॉ.आशिष नेवारे हेच शासकिय निवासस्थानात राहत असून सहयोगी वैद्यकीय अधिकारी डॉ.रिया अग्रवाल या मुख्यालयी न राहता दररोज गोंदिया ते काटी असा प्रवास आपल्या वाहनाने करतात.त्या कधीच वेळेवर सकाळी रुग्णालयात पोचत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या व रुग्णांच्या येऊ लागल्या आहेत.मंगळवारला सुध्दा डॉ.रिया अग्रवाल या ओपीडीच्यावेळेत हजर न होता तब्बल तासभर उशीराने रुग्णालयात पोचल्या.त्यामुळे शाळेतील मुलासंह गावखेड्यातील रुग्णांना त्रास सहन करावा लागला.जेव्हा डॉ.नेवारे यांनी रात्रड्युटी अंतर्गत सकाळी ६ वाजेपर्यंत एका रुग्णावंर त्यांनी उपचार केल्याचेही रुग्णालयाला भेट दिल्यावर तेथील कर्मचाèयांनी सांगितले.डॉ.अग्रवाल या रुग्णालयात वेळेहजर हजर राहत नसल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यापर्यंत पोचली परंतु त्यांनी संबधित डॉक्टराला कारणे दाखवा नोटीस देण्याएैवजी वैद्यकीय अधिकारी डॉ.नेवारे यांनाच पत्र दिल्याचे वृत्त हाती आले असून डीएचओ सुध्दा अपडाऊन डॉक्टरांना पाठीशी घालत त्यांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment