Friday, 6 October 2017

देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती अंतर्गत ११३ गावात स्वच्छता ही सेवा अभियान


देवरी,06:  देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ११३ गावात स्वच्छता अभियाना्अतर्गत गुडमाँर्निंग पथकाद्वारे काल गुरुवारी (ता.5) धडक मोहीम राबविण्यात आली.
या पथकात देवरीचे गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर याचे सह सर्व विस्तार अधिकारी,गटसमन्वयक
अंगणवाडी पर्यवेक्षिका,केंद्रप्रमुख ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक ,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका मदतनिस, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक चालक,ग्रामरोजगार सेवक, आरोग्य सेवक,विशेष म्हणजे महिला आथिर्क विकास महामंडळ चे वर्धिनी एम आर ई जी एस चे तांञिक अधिकारी,पंतप्रधान आवास योजनाचे अभियंता व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य व पोलीसपाटील  तसेच गावातील तरुण व तरुणी ईत्यादी समावेश होता. उघडयावर शौचास बसणा रे गावकरी महीला व पुरुषांना पुष्पगुच्छ देवून शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रत्येक ग्रा पं अंतर्गत प्रत्येक गावात प्रभावीपणे  राबविण्यात आल्याबद्दल संपूर्ण गुडमाँर्निंग पथकाचे प्रमुख व सर्व सदस्य व गावकरी व पदाधिकारी यांचे पंचायत समिती देवरी मार्फत अभिनंदन करण्यात आले. देवरी तालुक्यातील सर्व गावे ३१ डीसेम्बर २०१७ पर्यंत संपूर्ण रीत्या हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी तालुकावासीयांना केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...