देवरी:०७ (तालुका प्रतिनिधी)-स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मेहताखेडा या गावात आज शनिवारी स्वच्छताअभियान राबविण्यात आले. दरम्यान एका वनराई बंधारा सुद्धा तयार करण्यात आला.
या अभियानात देवरी पंचायत समितीमधील सर्व ग्रामसेवक व गटसाधन केंद्राचे पारधी, कुलदीप लांजेवार आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गाव व गावतील रस्ते ,नाली, शाळा, अंगणवाडी परीसर श्रमदानातून स्वच्छ करण्तयात आले. दरम्यान, गावाशेजारील नाल्यावर एक वनराई बंधारा सुद्धा बांधण्यात आला . याच पद्धतीने देवरी पंचायत समितीतील इतरही गावात उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांनी दिली.यावेळी उपस्थितांना शौचालय वापरासंबंधाने मार्गदर्शन करण्यात आले.
No comments:
Post a Comment