देवरी,21- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वाचे लक्ष लागलेल्या मुल्ला ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजपता धुव्वा उडवित कॉंग्रेसची सरशी झाली. मात्र, सरपंचपद भाजपच्या पारड्यात पडल्याने 'कही गम, कही खुशी'चे माहोल आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दशकांपासून देवरी तालुक्यातील मुल्ला ग्राम पंचायत ही भाजपच्या ताब्यात होती. या वर्षीच्या निवडणुकीत कॉंग्रेस तर्फे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भदाडे यांना सरपंच पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. याची धडकी भाजप गटात भरली. यामुळे आमदार संजय पुराम यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते असलेले आणि आता भाजपवाशी झालेले कृपासागर गौपाले यांना उमेदवारी जाहीर केली. असे असले तरी श्री भदाडे यांना पराभूत करण्यासाठी आमदार पुराम यांचे खंदे समर्थक असलेले युवा पत्रकार यांना बंडखोरी करवून सरपंच पदाची निवडणुक लढविण्याची खेळी भाजपतर्फे खेळण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते केशवराव भुते यांनी सुद्धा सरपंच पदासाठी आपले नामांकल दाखल केले होते. मात्र, श्री भदाडे यांचे पारडेे जड वाटल्याने त्यांनी अखेर भाजपशी हातमिळवणी करीत गौपाले यांना पाठिंबा जाहिर केला.
भाजप व राष्ट्रवादी युतीने कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आकाशपाताळ एक केले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत एकूण मतदानाच्या 60 टक्के मते कॉंग्रेस समर्थित पॅनला पडली तर भाजपला केवळ 31 टक्के मतांवर समाधान मानावे लागले. यामध्य़े भाजपचेच दुसरे उमेदवार सुरेश लाडे यांना 126 म्हणजे 9 टक्के मते पडली. एकूण 1394 मतांपैकी 831 मते घेत कॉंग्रेसच्या परिवर्तन पॅनलचे राजू खोटेले, छन्नू कांबळे, नेतराम कांबळे, संगीता नागोसे , चंदन घासले, प्रभा वंजारी आणि सीमा नाइक हे उमेदवार विजयी ठरले.
No comments:
Post a Comment