Tuesday, 10 October 2017

आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


petrol-2
मुंबई,दि.10- राज्यामध्ये मंगळवारपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहे. राज्यात पेट्रोल 2 रूपये तर डिझेल 1 रूपयाने स्वस्त होणार आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये कपात करत सर्वसामान्य जनतेला दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली. पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी आणि डिझेल प्रतिलिटर एक रुपयानं स्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवरुन दिली होती. त्यानंतर आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकित त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मंत्रिमंडळातील या निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून हे नव दर लागू होतील.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...