Wednesday 4 October 2017

दिवाळीच्या तोंंडावर पेट्रोल-डिझेलची दर कपात

नवीदिल्ली,04- केंद्र सरकारने दिवाळीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले होते. 
Ads by ZINC

नोव्हेंबर २०१४ पासून जानेवारी २०१६ पर्यंत नऊ वेळा एक्साइज ड्युटी वाढवली होती. त्याच काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली होती. पंधरा महिन्यांमध्ये सरकारने पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी ११.७७ रुपयांनी तर डिझेलवरील ड्युटी १३.४७ रुपयांनी वाढवली होती. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत करापोटी मिळणारा महसूल दुपटीने वाढला. गेल्या वर्षी सरकारला २ लाख ४२ हजार कोटी रुपये मिळाले होते. सरकारने बेसिक एक्साइज ड्युटीमध्ये दोन रुपयांची कपात करण्यात येत असल्याचे जाहीर केले. 
पेट्रोल, डिझेल घरपोच मिळेल -  धमेंद्र प्रधान 
गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल घरपोच मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी ट्‍वीट केले होते. घराघरात पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री लवकरच सुरू करू शकू, असे प्रधान यांनी म्‍हटले. मात्र, या त्यांच्या ट्‍वीटनंतर नेटिझन्‍सनी त्यांच्यावर टीका करण्‍यास सुरुवात केली. डिझेल आणि पेट्रोल घरपोच मिळालच तर आग लागण्‍याच्‍या घटना घडतील, असे अनेकांनी भीती व्‍यक्‍त केली. तर, पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आधी निम्‍म्‍यावर आणा, अशी सूचना ट्‍वीटर यूजर्सनी केली. हे सगळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेल्‍या दरावरुन लक्ष हटवण्‍यासाठी केले जात आहे, असे ट्‍विटरवर म्‍हटले. तसेच, ट्‍विटरवरुन अनेकांनी या पेट्रोल, डिझेल विक्रीच्‍या निर्णयाची खिल्‍ली उडवली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...