Wednesday, 4 October 2017

अंकुश उके या युवकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू

गोंदिया,दि.04- येथील छोटी गोंदियातील विठ्ठल रुखमाई मंदिराजवळील तलावात मंगळवारच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास शारदा विसर्जन करतांना अंकुश राजेश उके या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सकाळपासून त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.विशेष म्हणजे जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडे गोताखोर नसल्याने तलावात मृतदेह शोधण्यास अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.नगराध्यक्ष अशोक इंगळे हे सकाळपासून घटनास्थळी पोचून शोधकार्यात सहकार्य करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...