Saturday, 2 May 2020

पारंपरिक शेती व्यवसायाची ओढ कायम,तरुणांची आधुनिक शेतीकडे वाटचाल

सालेकसा,दि.02 : २१ व्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करण्याचा मनसुबा ठेवून झटपटताना दिसत असते. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके, सेंद्रिय शेती अशा विविध प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग ते करत आहेत. 
त्यामुळे पारंपरिक शेती व्यवसायाप्रती तरूणपिढीचा जिव्हाळा कायम असल्याचे दिसत आहे. वडिलोपर्जित शेती असलेले अनेक सुशिक्षीत, नोकरी व व्यवसाय करीत असलेले तरुण आपला नोकरीधंदा सांभाळून शेतीची कामे देखिल करत आहेत. त्यामध्ये ऑटो स्पेयर पार्टचे व्यवसायी प्रदीप चुटे सलंगटोला, प्राध्यापक संदीप अग्रवाल साखरीटोला, शेतिनिष्ठ शेतकरी तुकाराम बोहरे गांधीटोला, जनरल स्टोर्स व्यवसायी नंदू चुटे सलंगटोला, कंत्राटदार प्रभाकर दोनोडे साखरीटोला, हार्डवेयर व्यवसायी रवि चुटे सलंगटोला, चरणदास चंद्रिकापुरे बीजेपार, असे असंख्य तरुण आपला नोकरीधंदा, व्यवसाय, सांभाळून शेतीकड़े विशेष लक्ष घालत आहेत.
शेती व्यवसाय पहिले सारखा राहिला नाही. आजघडीला अनेक संकटांना तोंड देत शेतकरी शेती व्यवसाय करीत आहेत. तर शेती व्यवसायातील होणारी तुट आणि शासनाचे दुर्लक्षित धोरणामुळे अनेकांना शेतीला बगल दिली आहे. युवापिढीमध्ये शेती प्रति जिव्हाळा नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच ऑटो स्पेयर पार्टचे व्यवसायी प्रदीप चुटे सलंगटोला, प्राध्यापक संदीप अग्रवाल साखरीटोला, शेतिनिष्ठ शेतकरी तुकाराम बोहरे गांधीटोला, जनरल स्टोर्स व्यवसायी नंदू चुटे सलंगटोला, कंत्राटदार प्रभाकर दोनोडे साखरीटोला, हार्डवेयर व्यवसायी रवि चुटे सलंगटोला, चरणदास चंद्रिकापुरे बीजेपार, असे असंख्य तरुण आपला नोकरीधंदा, व्यवसाय, सांभाळून शेतीकड़े विशेष लक्ष घालत आहेत. या तरूण शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबून आधुनिक शेतीचा मुलमंत्र घेवून ठिंबक सिंचनच्या साहाय्याने सध्या शेतात भेंडी, टमाटर, वांगे, बरबटी (चवळी), दोडकाची लागवड केली आहे भाजीपालासह फळदार झाड़ाच्या लागवडीकडे ते वाटचाल करीत आहेत. साखरीटोला येथील कृषि सेवा केन्द्राचे संचालक कृषि चिकित्सक देवराम चुटे युवकांसाठी प्रेरणास्तोत्र ठरत आहेत. युवकांना लागवडी संदर्भात तसेच खत, कीटनाशक, विविध रोग, कीड विषयी माहिती पुरवत असतात. संचारबंदी काळापासून असंख्य युवकांचा कल शेतीकडे वळला असून आता ते आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याची तयारी दाखवत आहेत. शेतीसारखा दुसरा कोणाता शाश्वत व्यवसाय नाही. तरुणांना कळले आहे. हा सकारात्मक बदल इतर तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. काळानुरूप शेतीला तंत्रज्ञानाची जोड देवून शेती करता येते, हे या युवकांनी दाखवून दिले आहे.

खासदार मेंढेनी घेतला कोरोनाविषय स्थितीचा आढावा

गोंदिया,दि.०२ःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंढे यांनी गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काय उपाययोजना करण्यात येत आहेत,याचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.त्यापुर्वी त्यांनी सौंदड येथील विश्रामगृहात अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उपविभागीय अधिकारी,तहसिलदाराकंडून घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनिल मेंढे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत गरजुंना जेवणाची सोय,स्थलांतरीतांची सोय,लॉकडाऊनदरम्यान उत्पन्न होणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती घेतली.
दरम्यान रेशन कार्ड नसलेल्या लोकांसाठी व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार मेंढेनी बैठकीत दिले.जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधकामासाठी लागणारी वाळू लाभथ्र्यांना उपलब्ध करण्याचे तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिदे,माजी आमदार रमेश कुथे,उमेश मेंढे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपूर कारागृहसुद्धा लॉकडाऊन – गृहमंत्री

मुंबई,दि. 2: कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहसुद्धा तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह,ठाणे मध्यवर्ती कारागृह,  येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या  कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल.

Friday, 1 May 2020

सहा.पोलिस निरिक्षक भाष्कर,बघेलेसह 11 जणांना पोलिस महासंचालक पदक

गोंदिया,दि.01 : पोलीस दलात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानित केले जाते.गोंदिया जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
नक्षल्याविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल हा पदक जाहिर करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने नक्षल सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागेश भाष्कर(देवरी),नक्षल आपरेशन सेल गोंदियाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोदकुमार केशरीचंद बघेले,बिनतारी संदेश विभाग देवरी पोलिस उपनिरिक्षक दिलीप जाधव तर कर्मचारीमध्ये पोलिस हवालदार रमेश खंडाते,नक्षल सेल स्वर्णदिप भालाधरे,राजेंद्र भेंडारकर,रीना चव्हाण,सुदर्शन वासनिक,पोलिस मुख्यालयातील मुस्ताक अहमद वारिस सय््यद,प्रभाकर पालांदूरकर,सायबर सेलचे धनजंय शेंडे आदींचा समावेश आहे.या सर्वांचे पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे,अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी,21 मे रोजी निवडणूक


मुंबई,दि.01. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अखेर संपुष्टाता आला आहे. कारण विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी दिली आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला करावी, असे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. हे पत्र घेऊन गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले. त्यापाठोपाठ राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणुकीची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी सूचना केली आहे.
निवडणूक कशासाठी?
राज्यपाल सदस्याच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरीही त्या आमदारकीची मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे नव्याने नियुक्तीऐवजी रिक्त जागांसाठी निवडणूक घेऊनच मुख्यमंत्र्यांनी रीतसर विधिमंडळाचे सदस्य व्हावे, असा मतप्रवाह होता.
महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर.
11 मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
14 मे पर्यंत अर्ज माघारी घेता येणार.
21 मे रोजी मतदान
26 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
ज्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याबाबतची सुचना केली आहे त्या बाबत-
रिक्त झालेल्या जागा
भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १
निवृत्त झालेले सदस्यशिवसेना
१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)
भाजप
१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस
१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर
काँग्रेस
१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)
पक्षीय बलाबल
भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३
*निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते.

दारुमुळे व्हायरस नष्ट होईलः दारूविक्रीसाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

CoronaVirus Marathi News: Alcohol will destroy the corona virus, start selling alcohol, Congress MLA's letter to CM ashok gehlot MMG | CoronaVirus News: दारुमुळे घशातून व्हायरस नष्ट होईल, राज्यात दारुविक्री सुरु करा, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्रकोटा,दि.01 - राजस्थानमधील काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून राज्यातील दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि दारुपासून मिळणाऱ्या कराची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, सरकारने खुलेपणाने दारुविक्रीला परवानगी नाकारली आहे. मात्र, अवैधपणे दारुविक्री जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे काही जणांचा हा लॉकडाऊन काळात स्वयंरोजगार झाल्याचे राजस्थानच्या कोटा येथील सांगोद मतदारसंघाचे आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी म्हटले आहे.
देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याने देशातील विविध राज्यात राजकीय पक्षातील नेते आणि काही नामवंत व्यक्तींकडून दारु सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात दारुची दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स& सुरु करून राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे, अशी सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अवैध दारुविक्री सुरु असल्याचे मान्य केले होते. राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो, थोरातांनी सांगितलं होतं. आता, राजस्थानमधील आमदार भरतसिंह कुन्दनपूर यांनी सविस्तरपणे पत्र लिहून राज्यात दारु सुरु करण्याची मागणी केली. अवैध आणि घावटी दारु विक्रीचं प्रमाण वाढलं असून ते पिणाऱ्यांना शारिरीक त्रास होत आहे. ३० एप्रिल रोजीच्या एका बातमीचा संदर्भ देत, घावटी दारु पिल्याने दोघांना अंधत्व आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, अवैध दारुविक्री सुरु असून राज्यात महसूल तुट भरुन काढण्यासाठी दारुची दुकाने सुरु करावी असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, जर कोरोना व्हायरस हातावर दारु टाकल्यानंतर निघून जातो, तर पिणाऱ्यांच्या घशातून तो व्हायरस साफ होईल, तो व्हायरल नष्ट होईल, असे धक्कादायक विधान या आमदारांनी केले आहे.

परशुरामकरांच्या स्थानिक निधीतून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना पीपी किट्सचे वाटप


(सड़क /अर्जुनी),दि.01:: तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी आपल्या जिल्हा परिषद स्थानिक निधीतून पीपीटीकिटस उपलब्ध करुन दिल्या.मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी परशुरामकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 30 एप्रिल रोजी त्याचे वितरण रुग्णालयत केले.
जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी कोरोनावर प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी आपले स्थानिक विकास निधीतून तालुका वैद्किय अधिकार्यांना दोन लाख रुपये उपलब्ध करून दिले.त्यात तालुक्यातील खोडशिवनी,शेंडा, पांढरी,डव्वा हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र व सडक अर्जुनी व सौदड ग्रामीण रूग्णालयांना पी पी किट्स,मास्क,हातमोजे,sanitazr उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले होते.पीपी किट्स उपलब्ध झाल्याने किट्सचे वाटप सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार मनोहर चंद्रीकपूरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर,किशोर तरोणे,रमेश चूरे,अविनास काशिवार,लोकपाल गहाने,खंड विकास अधिकारी निर्वाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.मेश्राम,ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ.धुम्मनखेडे,डॉ.संकेत परशुरामकर याशिवाय बरेच मान्यवर उपस्थित होेते.


देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...