गोंदिया,दि.०२ःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंढे यांनी गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काय उपाययोजना करण्यात येत आहेत,याचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.त्यापुर्वी त्यांनी सौंदड येथील विश्रामगृहात अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उपविभागीय अधिकारी,तहसिलदाराकंडून घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनिल मेंढे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत गरजुंना जेवणाची सोय,स्थलांतरीतांची सोय,लॉकडाऊनदरम्यान उत्पन्न होणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती घेतली.
दरम्यान रेशन कार्ड नसलेल्या लोकांसाठी व्यवस्था करण्याचे निर्देश खासदार मेंढेनी बैठकीत दिले.जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधकामासाठी लागणारी वाळू लाभथ्र्यांना उपलब्ध करण्याचे तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिदे,माजी आमदार रमेश कुथे,उमेश मेंढे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment