गोंदिया,दि.30ःःकरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झाल्यापासून गेल्या 3 महिन्याचा विचार केला गेल्यास आजपर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात करोना रुग्ण आढळले होते.मात्र देवरी तालुका यास अपवाद ठरला होता.त्या देवरी तालुक्यात आज नागपूर येथील विषाणू प्रयोगशाळेतून आलेल्या 4 अहवालापैकी 1 असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुके आता करोनाबाधित झाले आहेत. आज 30 मे रोजी प्राप्त अहवालापैकी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 1 रुग्ण देवरी तालुक्यातील तर तीन रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बधितांचा संख्या ६६ इतकी झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे आजच 4 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. कोरोनामुक्त झालेले एकूण रुग्ण 32 इतके आहे. जिल्ह्यात आता ३४ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला . दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली.तर 29 मे रोजी तब्बल २५ रुग्ण व आज 30 मे रोजी 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.त्या सर्वांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.
#कोविड१९ #भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्ह – २९
२९ मे रोजी तपासणीसाठी पाठविलेले नमुने – ३९
आज पॉझिटिव्ह – ०३
बरे झालेले पॉझिटिव्ह – ०१
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – २८
आतापर्यंत पाठविलेले स्वॅब १६९१
एकूण निगेटिव्ह – १५६९
अहवाल अप्राप्त – ९३
No comments:
Post a Comment