Monday 11 May 2020

जनतेचे आमदार संघाने थकवलेले पैसे दुध उत्पादकांना मिळवून देणार?

गोंदिया,दि.11ःगोंदियातील बंद दुध संकलन केंद्र सुरु करण्यासाठी जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा दुध संघाकडून माहिती घेत पुढाकार घेतल्याचे त्यांच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले गेले आहे.तेव्हा बंद दुध संकलन सुरु करण्यासाठी पुढाकार घेणारे जनतेचे आमदार आत्ता दुध उत्पादक शेतकèयांचे २०१७ पासूनचे थकलेले कोट्यावधी रुपयाचे देयके जिल्हा दुध संघाकडून मिळवून देणार काय अशा प्रश्न गावपातळीवरील संस्थेच्या दुध उत्पादकांनी केला आहे.त्यामुळे जनतेचे आमदार या प्रश्नात संघाच्या बाजूने राहतात की जनतेच्या बाजूने जात खरा न्याय मिळवून देतात का याकडे नजरा खिळल्या आहेत.
सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा पाच रुपये कमी दराने  पैसे देणाèया गोंदिया जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षांसाठी बरखास्त करण्याचा सहकारी संस्था (दुग्ध) नागपूरचे विभागीय उपनिबंधक एस. एन. क्षीरसागर यांचा आदेश सहनिबंधकांनी कायम ठेवत सहनिबंधकांच्या सुनावणी अहवालानुसार नागपूर विभागीय उपनिबंधक(दुग्ध)यांनी गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संस्थाच्या संघावर प्रशासक नेमले होते.दूध उत्पादकांच्या तक्रारीच्या आधारे विभागीय उपनिबंधकांनी हमी भाव देणे बंधनकारक असतानाही सरकारी निर्णयाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाला जबाबदार ठरवित विभागीय उपनिबंधकांनी मंडळाला सहा वर्षांपासाठी अपात्र ठरवले होते.मात्र तत्कालीन भाजप सरकारमधील जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय हस्तक्षेप करीत तत्कालीन दुग्धविकास मंत्र्यांकडून संचालक मंडळाला जिवनदान दिले.सरकारडून न्या न मिळाल्याने हे दुध उत्पादक न्यायालयापर्यंत पोचले मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.
मात्र जिवनदान मिळालेल्या संचालक मंडळाने अद्यापही त्या दुध उत्पादक संस्थांचे १ कोटीच्यावर असलेली थकबाकी दिलेली नाही.त्यातच जनतेचे आमदार म्हणून सध्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात विनोद अग्रवाल यांचा प्रचार केला जात आहे.हे जनतेचे आमदार जिल्हा दुध संघाने २१ जुर्ले २०१७ ते २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ७० लाख रुपये दुधाचा अडवलेला चुकारा तर १ एप्रील ते २० नोव्हेंबर २०१९ पर्यंतचा दुध उत्पादकांचा सुरक्षा निधी १८ लाख रुपये,२२ लाख रुपये दुध उत्पादक संस्थाचे शेयर्सचे असे १ कोटीच्यावरील रक्कम दुध संस्थांना मिळवून देणार काय अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.आत्ता हे जनतेचे आमदार खरोखरच दुध संघाकडून जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी व संस्थांचा थकलेला पैसा मिळवून देण्यासाठी काय करतात याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...