Thursday 7 May 2020

अवैध वाळूमाफियाने केली पोलीस पाटलाच्या गाडीची तोडफोड


आमगाव,दि.07ः– गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणारा व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु याच पोलीस पाटलाला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने गावाजवळील नदीतील अवैध वाळू उपसा बाबत माहिती देणे महागात पडले आहे.त्यानी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हि पोलीस कुठलीही दखल घेत नसल्याची खंत करंजीचे पोलीस पाटील प्रेमलाल लांजेवार यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.
तालुक्यातील करंजीचे पोलीस पाटील प्रेमलाल लांजेवार यांनी रिसामा येथील शिवमंदिर परिसरात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले की, १ मे २०२० ला गावाजवळील पांगोली नदीवरून अवैधरित्या वाळू उपसा करून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरबाबत तहसीलदारांना माहिती दिली. सदर ट्रॅक्टर गावातीलच रामेश्वर बाबूलाल शेंडे (वय ६०)यांच्या मालकीचे असून तहसीलदार डी.एस.भोयर यानी ताबडतोब अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.
याचाच राग मनात धरून रामेश्वर शेंडे व त्यांचा मुलगा संतोष शेंडे यांनी पोलीस पाटलाला बघून घेऊ अशी धमकी दिली होती.पोलीस पाटील प्रेमलाल लांजेवार २ मे रोजी रात्री झोपी गेल्यानंतर गैरअर्जदाराने घरासमोर ठेवलेली टाटा टिगोर गाडी (क्र.MH35 AG1405)चे डाव्या बाजूचे समोरील कांच व मागच्या बाजूचा कांच फोडून या अंदाजे ७०००रुपयाचे नुकसान केल्याचे सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात आली.त्यानंतर ३ मे २०२० रोजी सरपंच हंसराज श्रवण चुटे, व तंटामुक्त अध्यक्ष गणेश रतीराम हुकरे यांना माहिती देत त्याच दिवशी त्यांना सोबत घेऊन आमगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.परंतु तीन चार दिवस लोटूनही पोलिसांनी गैरअर्जदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.या बाबत आपणास फार वाईट वाटत असल्याची खंत त्यानी पत्रपरिषदेत व्यक्त करीत आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यानी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.आपण पोलीस पाटील संघटनेमार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करू असेही म्हटले आहे.पोलिसांचा मित्र समजला जाणाऱ्या पोलीस पाटलांनाच प्रशासनाची मदत करणे महागात पडल्याची खंत व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...