Friday 8 May 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कदम व शिपाई बिलनवार एसीबीच्या जाळ्यात

भंडारा,दि.08 : बियर शाॅपीचे वार्षिक चालान भरल्यानंतर पुढील वर्षात दुकान सुरु ठेवण्याकरीत निशुल्क दिली जाणारी पोचपावती देण्याकरीता लाच मागणार्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक तानाजी शिवाजी कदम व शिपाई किशोर चंदूलाल बिलनवार यांना १ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार हे जवाहरनगर भंडारा येथील रहिवासी असुन तक्रारदार हे बियर शाॅपचे मालक आहेत. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे लाॅकडाउन सुरू असल्याने १९ मार्च २०२० पासुन तक्रारदार यांचे बियर शाॅप बंद आहे. बियर शाॅपीचे वार्षिक चालान भरून झाल्यावर पुढील आर्थिक वर्षात दुकान सुरू करण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा कडून पोचपावती विनामुल्य दिली जाते. सदरची पोचपावती घेण्याकरीता तक्रारदार हे राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय भंडारा येथे गेले असता निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांनी तक्रारदारास बियर शाॅपी दुकानाची पोचपावती देण्याकरीता १ हजार रू. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांना भेटून तक्रार नोंदविली.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय भंडारा येथील निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांचे विरूध्द योजनाबध्दरित्या आज ८ मे रोजी सापळा रचला.त्यावेळी निरीक्षक तानाजी कदम यांनी तक्रारदारास बियर शाॅपी दुकानाची पोचपावती देण्याकरीता 1 हजार रू. लाचेची मांगणी करून अरोपी किशोर चंदुलाल बिलनवार याच्या हस्ते लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडले. त्याबाबत तानाजी शिवाजी कदम निरीक्षक व किशोर चंदुलाल बिलनवार शिपाई यांचे विरूध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे.
सदर कार्रवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, एसीबी नागपूर, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात योगेश्वर पारधी पोलीस निरीक्षक, संजय कुरंजेकर, रविंद्र गभणे, कोमलचंद बनकर, सचिन इलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राउत, कुणाल कढव, रसिका कंगाले, दिनेश धार्मीक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...