Thursday 14 May 2020

घरी परतणाऱ्या त्या मजूरांचा तो प्रवास ठरला अखेरचाच

गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी
गुना,दि.14 - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 74 हजारांवर पोचली. सुमारे अडीच हजारावर मृत्यूमुखी पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा तर केली. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाल्याने त्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. साधनाभावी अनेकांनी पायी घर गाठायचे ठरवले. अनेक मार्गांनी लोक आपापल्या गावी जात आहेत. याच काळात मध्यप्रदेशात एक दुर्दैवी असा भीषण अपघात झाला. गुनामध्ये लॉकडाऊन दरम्यान कंटेनर आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात 8 मजुरांचा मृत्यू तर 50 हून अधिक जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुमारे 60 मजूर हे कंटेनरमध्ये होते. ते महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशातील आपल्या गावी जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गुना येथील कँट परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाल्याने 8 मजुरांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाले. भीषण अपघातानंतर कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये रोडवेज बसने आपापल्या घरी परतणाऱ्या कामगारांना चिरडले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले. दोन गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मजूर पंजाबमध्ये कामाला होते आणि बिहारला जात होते. गुरुवारी मुजफ्फरनगर कोतवालीच्या सहारनपूर रोडवर मजूर पोहोचले. तेव्हा रोडवेज बसने त्यांना चिरडले. या घटनेत 6 कामगार जागीच ठार झाले. दोन जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असून ते पंजाबहून पायी परतत होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...