Wednesday 20 May 2020

करांडली व आमगाव येथील दोन व्यक्ती करोनाबाधित आढळल्या

३६९ अहवाल नकारात्मक, ६१ अहवालाची प्रतीक्षा
९७ व्यक्ती विलगीकरणात तर ६३अलगीकरण केंद्रात

गोंदिया दि.20ः जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाधा झालेले दोन रुग्ण आज १९ मे रोजी प्राप्त विषाणू चाचणी अहवालावरून आढळून आले.या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. ३८ व्या दिवशी नवीन दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. पहिला रुग्ण 26 मार्च रोजी कोरोना बाधित आढळून आला होता.10 एप्रिलला त्याचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्याला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली व आमगाव तालुक्यातील आमगाव येथील बाधीत व्यक्तींचा समावेश आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी करांडली हे कंटेनमेंट घोषीत केले असून त्यासोबतच परिसरातील बोंडगावसुरबन,केऴवद,सुरबंद,तुकुमनारायण,दिनकरनगर व जरुफाटा या गांवाना बफर झोन जाहिर करीत या गावांच्या सीमा सिल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य,तीव्र लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एकूण ४३३ व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  चाचणीसाठी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.त्यापैकी ३७२ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये ३६९ नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक तर ३ नमुने सकारात्मक आले आहे.
 १९ मे रोजी नागपूर येथील  विषाणू चाचणी प्रयोगशाळेत ६१ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठविण्यात आले.एकूण ६१ नमुन्यांचा चाचणी अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यातील सात शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ६३ व्यक्ती उपचार घेत आहे. 
कोविड केअर सेंटर असलेल्या गोंदिया येथील नवीन जिल्हा क्रीडा संकुल  येथे ९४, आमगाव येथील भवभूती महाविद्यालय येथे १ आणि डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर असलेल्या एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया येथे १ आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे १ असे एकूण ९७ रुग्ण विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे.

 शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी - ४, लईटोला - ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा - १० ,उपकेंद्र बिरसी - ७ , शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा - २६, समाजकल्याण निवासी शाळा,डव्वा - ७ आणि जलराम लॉन,गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ६३ व्यक्ती या सात शासकीय संस्थांत्मक  अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे.विलगिकरण केंद्रातील ९४ आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील ६३ असे एकूण १६० व्यक्ती उपचार घेत आहे.

 कोरोनाबाबत काही माहिती जाणून घ्यावयाची असल्यास किंवा त्यांना सल्ला हवा असल्यास  हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...