नागपूर - अमरावती महामार्गावर कारंजा(घाडगे) येथे पेट्रोल पंप जवळ घडली घटना - ट्रॅव्हल्समध्ये ५० मजुरांचा होता समावेश
वर्धा,दि.०३::- सुरत येथून ओडिसाकडे मजूर घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील पेट्रोल पंप जवळ पलटी झाली. यात तीन मजूर जखमी झाले आहेत तर ट्रॅव्हल्स चा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पसार झाला आहे.लॉक डाऊन शिथिल होताच मजूरांना आपल्या गावी पोहचविण्यासाठी परवानगी मिळत आहे. त्यानुसार सुरत येथून 50 मजूर घेऊन ट्रॅव्हल्स ओडिशा येथे निघाली होती. वाटेत वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे ट्रॅव्हल्स पलटी झाली आहेय. अचानक वन्यप्राणी आडवा आला आणि ट्रॅव्हल्स पलटी झालीय. घटनेनंतर ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनर मात्र दुस-या वाहनाने पसार झालेय. यात तीन मजूर जखमी झाले. जखमींना ग्रामीण उपजिल्हा रुग्णलाय कारंजा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
No comments:
Post a Comment