Saturday 2 May 2020

पारंपरिक शेती व्यवसायाची ओढ कायम,तरुणांची आधुनिक शेतीकडे वाटचाल

सालेकसा,दि.02 : २१ व्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करण्याचा मनसुबा ठेवून झटपटताना दिसत असते. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके, सेंद्रिय शेती अशा विविध प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग ते करत आहेत. 
त्यामुळे पारंपरिक शेती व्यवसायाप्रती तरूणपिढीचा जिव्हाळा कायम असल्याचे दिसत आहे. वडिलोपर्जित शेती असलेले अनेक सुशिक्षीत, नोकरी व व्यवसाय करीत असलेले तरुण आपला नोकरीधंदा सांभाळून शेतीची कामे देखिल करत आहेत. त्यामध्ये ऑटो स्पेयर पार्टचे व्यवसायी प्रदीप चुटे सलंगटोला, प्राध्यापक संदीप अग्रवाल साखरीटोला, शेतिनिष्ठ शेतकरी तुकाराम बोहरे गांधीटोला, जनरल स्टोर्स व्यवसायी नंदू चुटे सलंगटोला, कंत्राटदार प्रभाकर दोनोडे साखरीटोला, हार्डवेयर व्यवसायी रवि चुटे सलंगटोला, चरणदास चंद्रिकापुरे बीजेपार, असे असंख्य तरुण आपला नोकरीधंदा, व्यवसाय, सांभाळून शेतीकड़े विशेष लक्ष घालत आहेत.
शेती व्यवसाय पहिले सारखा राहिला नाही. आजघडीला अनेक संकटांना तोंड देत शेतकरी शेती व्यवसाय करीत आहेत. तर शेती व्यवसायातील होणारी तुट आणि शासनाचे दुर्लक्षित धोरणामुळे अनेकांना शेतीला बगल दिली आहे. युवापिढीमध्ये शेती प्रति जिव्हाळा नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच ऑटो स्पेयर पार्टचे व्यवसायी प्रदीप चुटे सलंगटोला, प्राध्यापक संदीप अग्रवाल साखरीटोला, शेतिनिष्ठ शेतकरी तुकाराम बोहरे गांधीटोला, जनरल स्टोर्स व्यवसायी नंदू चुटे सलंगटोला, कंत्राटदार प्रभाकर दोनोडे साखरीटोला, हार्डवेयर व्यवसायी रवि चुटे सलंगटोला, चरणदास चंद्रिकापुरे बीजेपार, असे असंख्य तरुण आपला नोकरीधंदा, व्यवसाय, सांभाळून शेतीकड़े विशेष लक्ष घालत आहेत. या तरूण शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबून आधुनिक शेतीचा मुलमंत्र घेवून ठिंबक सिंचनच्या साहाय्याने सध्या शेतात भेंडी, टमाटर, वांगे, बरबटी (चवळी), दोडकाची लागवड केली आहे भाजीपालासह फळदार झाड़ाच्या लागवडीकडे ते वाटचाल करीत आहेत. साखरीटोला येथील कृषि सेवा केन्द्राचे संचालक कृषि चिकित्सक देवराम चुटे युवकांसाठी प्रेरणास्तोत्र ठरत आहेत. युवकांना लागवडी संदर्भात तसेच खत, कीटनाशक, विविध रोग, कीड विषयी माहिती पुरवत असतात. संचारबंदी काळापासून असंख्य युवकांचा कल शेतीकडे वळला असून आता ते आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याची तयारी दाखवत आहेत. शेतीसारखा दुसरा कोणाता शाश्वत व्यवसाय नाही. तरुणांना कळले आहे. हा सकारात्मक बदल इतर तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. काळानुरूप शेतीला तंत्रज्ञानाची जोड देवून शेती करता येते, हे या युवकांनी दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...