Thursday, 21 December 2017

संघाच्या बौध्दिक वर्गाला खडसेंची दांडीः भाजपने बजावली नोटीस




नागपूर,दि.21 - गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळ आणि संघटनेतून दूर केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले. नागपूरच्या हेडगेवार स्मृतीमंदिरात बुधवारी अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री या ठिकाणी आले मात्र, एकनाथ खडसे आणि विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी बौद्धिक वर्गाला दांडी मारली. या दोघांसह आणखी काही आमदार या बौद्धिकाला गैरहजर असल्याचे समजते. या सर्वांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली.
नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केले जाते. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी म्हटले की, पुनवर्सन हे विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नाही. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

2-जी स्पॅक्ट्रम घोटाळाः सात वर्षात एकही ठोस पुरावा नाही

नवी दिल्ली,दि21 (पीटीआय) - 'गेली सात वर्षं मी '2जी' खटल्यामध्ये एकतरी ठोस पुरावा समोर येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. पण सगळं व्यर्थच ठरलं!' अशा शब्दांत सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी नाराजी व्यक्त केली. बहुचर्चित 2-जी प्रकरणात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्यासह 17 आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) निर्दोष मुक्तता केली. 
हा निर्णय जाहीर करताना न्यायाधीश सैनी यांनी वरील टिप्पणी त्यात केली आहे. 'गेल्या सात वर्षांमध्ये सर्व कामकाजांच्या दिवशी मी प्रामाणिकपणे रोज सकाळी दहा ते पाच या कालावधीत न्यायालयात बसून राहिलो.. या प्रकरणात कुणीतरी कायद्याच्या कसोटीला पुरेपूर उतरणारा सज्जड पुरावा समोर ठेवेल, अशी माझी अपेक्षा होती.. पण हे सगळं व्यर्थच ठरलं!' अशी टिप्पणी न्यायाधीश सैनी यांनी 1,552 पानी निकालामध्ये केली आहे. 
कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील 'यूपीए' सरकारवर 2-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारामुळे मोठा डाग लागला होता. यासंदर्भात देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यावरून असंख्य अफवाही पसरल्या होत्या. या सर्वांची दखलही सैनी यांनी या निकालामध्ये घेतली आहे. 'अफवा, चर्चा आणि जनतेच्या मनातील शंका-कुशंकांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये काहीही स्थान नसते', असे त्यांनी यात नमूद केले आहे. 
सीबीआयने या प्रकरणी ए. राजा आणि कनिमोळी यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्रुटी होत्या, असेही न्यायाधीश सैनी यांनी स्पष्ट केले. सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रामध्ये नाव घेतलेल्या एकाही आरोपीविरुद्ध ते पुरावे सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेताना अडचण आली नाही, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, 'या आरोपपत्रामध्ये नमूद केलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, असेही निदर्शनास आले आहे' असे ताशेरे न्यायाधीशांनी ओढले आहेत.

हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार


jairam thakur

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था)- हिमाचल प्रदेश विधानसभेत सलग पाचवेळा आमदार राहिलेले भाजप नेते जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती  आहे. याबाबत औपचारिक घोषणा शुक्रवारी होणार आहे.
ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेरज विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागी आता जयराम ठाकूर यांचे नाव चर्चेत  आहे. 
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकून विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने 21 जागा मिळवल्या आहेत. भाजपने बहुमत मिळवल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. यासाठी निवडणुकीपूर्वी पक्षाने प्रेमकुमार धुमल यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्यात आले आहे. ते आता मुख्यमंत्रिपदी लवकरच विराजमान होणार आहेत.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि शहर विकासमंत्री नरिंदर सिंह तोमर हे सिमला येथे गुरुवारी उपस्थित राहणार आहेत.ठाकूर यांना यापूर्वीच त्यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार असे सांगण्यात आले होते. तसेच याबाबत पक्षाची बैठक झाली होती. सीतारमन, तोमर, वरिष्ठ नेते शांताकुमार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सत्ती या नेत्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर सरकार स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. 

ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये ९व्या क्रीडासंमेलनाचे थाटात उद्धघाटन


देवरी 21 (तालुका प्रतिनिधी) - येथील नामांकित ब्लॉसम पब्लिक शाळेमध्ये ब्लॉसम महोत्सव 2017-2018 च्या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्धघाटन करण्यात आले. 
या कार्यक्रमात अतिथी म्हनूण देवरीचे डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि प्राचार्य सुजित टेटे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले.  डंबल्स प्रात्यक्षिक सादर करून अतिथीचे स्वागत करण्यात आले.
अतिथीनीं क्रीडागणाचे भूमिपूजन  करून आणि फीत कापून या क्रीडासत्राची सुरुवात केली. शाळेतील सर्व विध्यार्थी या संमेलनात सहभागी झालेले आहेत. कबड्डी, व्हालीबॉल, रनिंग, चेस, मैदानी खेळ आणि विविध शालेय सांघिक व वयक्तिक खेळाची सुरुवात करण्यात आली. डॉ. चांदेवार यांनी खेळाचे विध्यार्थी जीवनातील महत्व समजावून सांगितले. सुजित टेटे यांनी बौद्धिक विकासासाठी शारीरिक विकास यावर मार्गदर्शन केला.
सदर कार्यक्रमाच्या यशासाठी क्रीडा शिक्षक राहुल मोगुर्ले, भोजराज तुरकर, अजित टेटे, वैशाली टेटे, वैशाली मोहुर्ले हर्षदा चारमोडे, स्वप्नील पंचभाई आणि सर्व शालेय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केला.

आमगाव येथे 45 युवकांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश


आमगाव,दि.21:  आमगावं तालुक्यातील तिगावं येथे भाजप,  बसप,आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातील 45 युवा कार्यकर्त्यानी गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महसचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसमध्ये  आज गुरूवारी (दि.21)  प्रवेश केला.   

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महासचिव सहषराम कोरोटे हे होते. या प्रसंगी देवरी-आमगावं विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, आमगाव तालुका कांग्रेसचे महासचिव गणेश हुकरे, तालुका युवक कांग्रेसचे  महासचिव नरेश बोपचे, सहसचिव हंसराज जोशी,  कोशाध्यक्ष प्रल्हाद गाते, देवरी तालुक्यातील कांग्रेस कार्यकर्ते छगनलाल मुंगनकर, सुधाकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

युपीत सर्वाधिक धार्मिक हिंसाचार




File photo of Yogi Adityanath

नवी दिल्ली : देशात 2014 ते 2016 या काळात सर्वाधिक धार्मिक हिंचासार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. धार्मिक हिंसाचाराच्या 450 घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक हिंसाचाराचा घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत. 
सरकारच्या वतीने राज्यसभेत आज ही माहिती देण्यात आली. धार्मिक हिंसाचारामध्ये उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे.
धार्मिक हिंसाचाराच्या 2014-16 या काळात कर्नाटकमध्ये 279 आणि महाराष्ट्रात 270 घटना घडल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात धार्मिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये 205; तर राजस्थानमध्ये 200 घटना घडल्या आहेत. धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये बिहार आणि गुजरात अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. बिहारमध्ये 197 आणि गुजरातमध्ये 182 घटना घडल्या आहेत. 

शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’


Akola Zilla Parishad;Acb trap employee taking bribe | अकोला जिल्हा परिषद; शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’
अकोला,दि.21 : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.
शिक्षण सभापती यांचा स्वीय सहायक असलेला श्रीकांत ठाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळांना होणाऱ्या पोषण आहारात खंड पडल्याबाबतची माहिती विचारून तक्रारकर्त्यास त्रास देत होता. शिक्षण विभागाच्या बैठकीतही ठाकरे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून तक्रारदारास त्रास देत होता. पोषण आहारात खंड का पडला, याबाबतची माहीती द्यायची नसेल, तर त्या मोबदल्यात दर महिन्याला पाच हजार रुपये द्या, अशी मागणी श्रीकांत ठाकरे तक्रारदाराकडे करत होता. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे श्रीकांत ठाकरेची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सापळा रचण्यात आला. यावेळी श्रीकांत ठाकरे याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक इश्वर चव्हाण, सैरिशे, सुनील, संतोष, प्रवीण यांनी ही कारवाई केली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...