Thursday 21 December 2017

संघाच्या बौध्दिक वर्गाला खडसेंची दांडीः भाजपने बजावली नोटीस




नागपूर,दि.21 - गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळ आणि संघटनेतून दूर केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले. नागपूरच्या हेडगेवार स्मृतीमंदिरात बुधवारी अधिवेशनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री या ठिकाणी आले मात्र, एकनाथ खडसे आणि विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी बौद्धिक वर्गाला दांडी मारली. या दोघांसह आणखी काही आमदार या बौद्धिकाला गैरहजर असल्याचे समजते. या सर्वांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली.
नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केले जाते. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एकनाथ खडसे यांना पुन्हा सरकारमध्ये सामावून घेतेल जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंचे पुनवर्सन करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी म्हटले की, पुनवर्सन हे विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नाही. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...