Saturday, 23 December 2017

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची आत्महत्या

चंद्रपूर दि.23: महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाच्या समक्ष कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
वनरक्षक महिलेच्या लैंगिक व मानसिक छळाच्या आरोपावरून चंद्रपूर उत्तरचे महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एन. केंद्रे यांची गुरुवारी चंद्रपूर येथे तडकाफडकी बदली केली. शुक्रवारी दुपारी केंद्रे थेट ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे सहाय्यक व्यवस्थापक डी.एच. चांदेकर यांच्या कक्षात जाऊन बसले. माझी बदली का केली म्हणून चांदेकर यांना विचारणा केली. चांदेकरांनी उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी खिशातून कीटकनाशक काढले आणि प्राशन केले. त्यांना अडवून लगेच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले होते.वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात केंद्रे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडितेने केला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...