Tuesday, 12 December 2017

देवरी येथे तालुका स्तरीय स्पोकन इंग्लिश कार्यशाळा


देवरी,(12)- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी पाच दिवसीय तालुकास्तरीय इंग्लिस स्पोकन कार्याशाळेत पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाची सुरवात आज मंगळवारी (दि.12) देवरी येथे करण्यात आली.

देवरी तालुक्यातील जिल्हा परिषदेतील इंग्रजी शिक्षकांसाठी आज स्थानिक  के एस जैन विद्यालय येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाला सुरवात करण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना चपखल इंग्रजी बोलता येण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका बजवावी, याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वर्कशॉपमध्ये उपस्थित शिक्षकांना रेहडीचे सहाय्यक शिक्षक विशाल कच्छवाये रेहड़ी आणि हरदोलीचे विशाल भेंडारकर यांनी मार्गदर्शन केले . स्पोकन इंग्लिश वर्कशॉपच्या या पहिल्या टप्प्यात एकूण 50 शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यशाळेच्या  यशस्वितेसाठी  विषय तज्ज्ञ धनवंत कावळे यांनी परिश्रम केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...