Friday 29 December 2017

स्वच्छता रॅलीने वेधले तुमसरकरांचे लक्ष

तुमसर,दि.29 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद तुमसरने स्वच्छता सर्व्हेक्षण रॅली काढली. शहरातून निघालेल्या या स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेसाठी तुमसर नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता अ‍ॅपही तयार करण्यात आला आहे. भ्रमणध्वनीद्वारे स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तुमसर नगर परिषदेने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या मिशनमध्ये व्हावा याकरिता स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीचे आयोजन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व उपाध्यक्ष कांचन कोडवानी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सदर स्वच्छता रॅलीचा गभने सभागृहातून प्रारंभ करण्यात आला. ही स्वच्छता रॅली तुमसर शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीत प्रथम:च सिंधी समाजाचे संत निरंकारी महिला मंडळाने सहभाग नोंदविला होता.
याचबरोबर लॉयन्स क्लब तुमसर, सिंधु युवा समिती, नगरपरिषद नेहरू विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, शारदा विद्यालय, यु.एस.ए. विद्यानिकेतन शाळेसह अन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. तसेच मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक सुनिल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद बरडे, डॉ. गोविंद कोडवानी, ललीत थानथराटे, कल्याणी भुरे, आशिष पडोळे, राजा लांजेवार, मेहताब ठाकूर, वर्षा लांजेवार, शारदा बचत गटाच्या स्वच्छतादुतांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...