Tuesday, 19 December 2017

भुजबळांच्या अडचणीत वाढः जामीन नाकारला





 Maharashtra Sadan scam: Chhagan Bhujbal's bail application denied | महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळांचा जामीन अर्ज नामंजूर
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना विशेष न्यायालयाने सोमवारी पुन्हा दणका दिला. या दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.‘दोन्ही जामीन अर्ज मी फेटाळत आहे,’ असे म्हणत न्या. एम. एस. आझमी यांनी आदेशाची प्रत दोन दिवसांनंतर उपलब्ध करू, असे म्हटले. यापूर्वी भुजबळ यांनी प्रकृतीचे कारण देत जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज रद्द केला.परिणामी, भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काही आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएचे कलम ४५ अवैध ठरविले. त्यामुळे भुजबळ यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘सर्वोच्च न्यायालयाने पीएलएमएचे कलम ४५ रद्द केले असले तरी अन्य कलमांतर्गत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जाऊ शकतो. ८५७ कोटी रुपये मनी लाँड्रिंग घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांनी केवळ २० कोटी रुपयांचा हिशेब दिला आहे. बाकीच्या रकमेचा हिशेब ते देऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बनावट कंपन्या बनवून त्यामध्ये सर्व बेहिशेबी रक्कम गुंतवली. तसेच भुजबळ समाजातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका केली, तर ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे,’ असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी न्यायालयात केला होता. २०१५मध्ये ईडीने भुजबळ यांच्यावर ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...