Saturday 23 December 2017

चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल


रांची(वृत्तसंस्था),दि.23- बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. या घोटाळ्यात आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्र यांसारख्या दिग्गजांच्या नशिबाचा आज फैसला होणार आहे. चारा घोटाळ्यात इतर 22 जणांवरही आरोप आहे. रांचीमधील सीबीआयचं विशेष कोर्ट या प्रकरणी आज निकाल देईल.2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात भाजपानेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पण, न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण भरवसा असून या प्रकरणात आपल्याला नक्की न्याय मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केस चालविण्याचा राज्यपालांनी दिलेला आदेश रद्द केला.  चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...