देवरी,28- श्री सहस्त्रबाहु कलार समाज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने येत्या 7 जानेवारीला रविवारी कलार समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मॉ धुकेश्वरी मंदीर परिसरात आयोजित या कलार समाज संमेलनाचे उद्घाटन रायपूर येथील भारतीय कल्चुरी जायस्वाल समवर्गीय महासभेचे राष्ट्रीयअध्यक्ष संजयकुमार जायस्वाल यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी नागपूर येथील कलार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर दियेवार हे राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायपूर येथील कोसरे कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष घनशाम मेश्राम उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाग घेऊ इच्छित सदस्यांनी आपल्या नावाची नोंद येत्या 30 तारखेपर्यंत करावयाचे आवाहन करण्यात आले आहे.
या श्री सहस्त्रबाहू संमेलनामध्ये जास्तीत जास्त समाजबांधवांनी भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment