नागपूर,दि.28 : अजनीतील एका तरु णाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (वय १२) घरात शिरून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. दीपक विठ्ठल वाघमारे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली.
रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास आरोपी वाघमारे पीडित बालिकेच्या घरात शिरला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. घरात ती एकटीच असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. त्यामुळे पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या बालिकेसोबत आरोपी वाघमारेने लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेली मुलगी गप्प बसली. दोन दिवसांपासून तिच्या वर्तनात फरक पडल्याचे लक्षात आल्याने पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलींच्या पालकांनी तक्र ार नोंदवल्यानंतर अजनी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
No comments:
Post a Comment