गोंदिया,दि.8ः- भंड़ारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यासह सरकारवर कडाडून टिका केली.त्या टिकेला उत्तर देण्यासाठी पक्षाच्या आदेशावर भंडारा व गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर टिका करण्यात आली.गोंदियाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गोंदियाचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नाना पटोले यांची पक्ष बदलण्याची जुनीच सवय असून त्यात नवीन काहीच नसून ते शेतकरी नेते असल्याचा सोंग करीत असल्याचे म्हणाले.जे पटोले एनबीसी या खासगी संस्थेला कर्जमाफीचा ठेका सरकारने द्यावा याची मागणी करीत होते,ते शेतकरी नेते कसे होऊ शकतात अशी टिका त्यांनी पटोलेंच्या राजीनाम्यावर करीत व्यक्तीगत स्वार्थासाठी पटोले काम करीत असल्याचे बडोले म्हणाले.या पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,आमदार गिरिष व्यास,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,आमदार विजय रहागंडाले,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,ओबीसी पद्रेश प्रतिनिधी विरेंद्र जायस्वाल,विनोद अग्रवाल,माजी आमदार भजनदास वैद्य आदी उपस्थित होते.
आमदार गिरीष व्यास म्हणाले की गेल्या तीन वर्षात कुठलेही काम केले नाही,त्यांची काम करण्याची कार्यप्रणालीच नसून न केलेल्या कामाचे अपयश लपविण्यासाठी शेतकरी,ओबीसींचा मुद्दा समोर करुन राजीनाम्याची नौंटकी पटोलेनी केल्याची टिका केली.राज्यातील व केंद्रातील सरकार हे शेतकरी हितासाठी काम करीत असल्याने पटोलेंची बोबांबोब काहीच कामाची नसल्याची घणाघाती टिका त्यांनी केली.हेमंत पटले यांनी पटोले यांनी पक्षाचे काम केले नसल्याचे सांगत गोंदिया जिल्ह्यात कुठलेच विकास काम केले नसल्याचेही म्हणाले.
ज्याप्रकारे खासदार नाना पटोले यांनी सरकार आणि पक्षाविरोधात वातावरण निर्माण केले, त्यावरुन त्यांचा राजीनामा अटळच होता, असेही वाघमारे म्हणाले. यापूर्वीही काँग्रेसमध्ये असताना अशाच प्रकारे अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. त्यांच्या या भूमिकेला जनताच धडा शिकवेल, असे मतही आमदार वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.तर भंडारा जिल्ह्यातील जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्या आत्महत्यांना नाना पटोलेच दोषी असल्याची टीका भंडारा येथील पत्रपरिषदेत भाजपच्या नेत्यांनी केली.
No comments:
Post a Comment