नवी दिल्ली,दि.८ः-गेल्या अनेक महिन्यापासून सातत्याने मी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले परंतु सरकारने लक्ष दिलेले नाही.संसदेच्या स्थायीसमितीच्या बैठकीसाठी मी आज दिल्लीत आलो होते,त्या बैठकीनंतर मला वाटले की आपण राजीनामा दिला पाहिजे.म्हणून मी आपल्या खासदारकीचा व भाजपचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना देण्याकरीता गेलो.परंतु त्या हजर नसल्याने लोकसभेच्या सचिवाकंडे मी आपला राजीनामा दिलेला आहे.शेतकèयांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचे वांरवार बघावयास मिळाले.प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी गेल्या काही महिन्यापुर्वी झालेल्या बैठकीत मी जेव्हा प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधण्याचे काम केले तेव्हाच प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी लक्ष न दिल्याने माझे त्यांच्याशी यावर वाद झाले होते.तेव्हापासूनच मला सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे जाणवू लागले नव्हे तर त्यांची भूमिकाच लोकशाही विरोधी असल्याचे दिसून आल्याचे खा.नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच आपण सध्या कुठल्याच पक्षात जाण्याचा विचार केला नसून एक दोन महिने मतदारसंघातील जनतेसोबत बसून आपण आधी त्यांची मते जाणून घेणार त्यानंतरच कुठला पक्षात जायचे कि काय करायचे ठरविणार असल्याचेही सांगितले.
गुजरात निवडणुकीला बघितल्यास मतमोजणीची तारीख आधी जाहिर होते त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर होते त्यामुळे माझ्या रिक्त जागेवर कधी निवडणुक होते हे सरकारच ठरवेल या आधीपासून राजस्थान व पंजाबमध्ये जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत.त्यामुळे २०१९ मध्येच निवडणुक होण्याची शक्यता असल्याचे सांगत निवडणुक आयोगालाही आत्ता स्वायत्त राहिले नसल्याची टिका त्यांनी केली.
No comments:
Post a Comment