तुमसर,दि.17ः- तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात वाघाने ठाण मांडले आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाघाने रानडुकराची शिकार केली. शिवारात वनविभाग व पोलिसांची चमू दाखल झाली आहे. वाघाच्या वास्तव्यामुळे परीसरात दहशत पसरली आहे.
चांदपूर संरक्षित जंगलात वन्यप्राण्यांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. या जंगलात मध्यप्रदेशातून वाघांचे आगमन होत आहे. जंगलात वाघांची संख्या वाढत असल्याने वनविभागाचे कर्मचारी सतर्क झाले आहेत. या जंगलात वाघ आणि बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. सायंकाळ होताच वाघ आणि बिबटचे दर्शन होत आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास धनेगाव शिवारात बाबा तुरकर यांच्या शेतशिवारात धानाची मळणी सुरू होती.
यावेळी वाघाने रानडुकराची शिकार करताना मजुरांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड केल्याने वाघ नाल्याच्या दिशेने पळून गेला. शिकार केलेल्या जागेवर पुन्हा येऊन बसला. नागरिकांनी वाघाची माहिती वनविभागाच्या कर्मचाºयांना दिली. या वाघावर वन व पोलीस विभागाचे कर्मचारी नजर ठेवून आहेत. नाल्यालगतच्या शेतात वाघ बसून आहे.
No comments:
Post a Comment