मुंबई,दि.21 : एकीकडे सामान्यांपासून गरीब नागरिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयातील अवाढव्य बिलामुळे सरकारी रुग्णालयांना प्राधान्य देतात. पण आता शुल्क आणि तपासणीच्या रकमेत सरकारी रुग्णालयेही वाढ करणार आहेत.
जेजे, सेंट जॉर्ज, जीटी कामा या रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. शुल्क वाढवण्याचा निर्णय महागाईमुळे घेण्यात आला असून १ जानेवारी २०१८पासून नवे दर लागू होणार आहेत. ब्रेन, इन्प्लांट, लॅप्रोस्कोपी यांसारख्या ३२ प्रकारच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचे शुल्क १४० रुपयांनी वाढवून २५० रुपये करण्यात आले आहे. केस पेपरच्या शुल्कासह उपचारांशी संबंधित सुमारे १००० सेवा महाग होणार आहेत. या दरम्यान शवविच्छेदनाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासणी, शस्त्रक्रिया आणि प्रमाणपत्राच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment