Sunday 17 December 2017

लाचखोर सरपंचासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

नागपूर,दि.१७- पांधण रस्त्याचे काम मिळवून देऊन बिल मंजूर केल्याच्या मोबादल्यात ४0 हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारशिवनी तालुक्यातील आमगाव येथील सरपंच आशीष बावनकुळे, त्यांचे वडील मारोतराव व ग्रामसेवकाला अटक केली आहे. ग्रामसेवक हरीश तुकाराम आकरे असे अटकेतील अन्य आरोपीचे नाव आहे.
आमगाव ग्रामपंचायतीअंतर्गत दोन लाख ९३ हजार ६७४ रुपये किमतीचे पांधण रस्ते बांधण्यात आले. हे काम मिळवून देणे तसेच बिल मंजूर केल्याचे सांगून बावनकुळे पितापुत्राने तक्रारदाराला (कंत्राटदार) १0 टक्के व ग्रामसेवक आकरे यांनी पाच टक्के अशी एकूण ४0 हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र, तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे, रोशन यादव, हेडकॉन्स्टेबल सुनील कळंबे, शिपाई रवी डहाट, मंगेश कळंबे, गजानन गाडगे, सरोज बुधे, परसराम साही, शिशुपाल वानखेडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान बावनकुळे पितापूत्रासह तिघांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पारशिवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...