
नागपूर अधिवेशनाच्या कामकाजासाठी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे पार पडली. या अधिवेशनाच्या अगोदर कामकाज सल्लागार समितीची मुंबईमध्ये बैठक झाली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नागपूरचे अधिवेशन चार आठवडयाचे चालवावे अशी मागणी केली होती. त्यावेळी नागपूरमध्ये अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडयाच्या बुधवारी बैठक घेवू आणि कामकाज वाढवण्यासंदर्भात निर्णय घेवू असे ठरले होते. आज आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीमध्ये आम्ही अधिवेशन अजुन दोन आठवडे वाढवा अशी मागणी केली. परंतु येत्या शुक्रवारीच सरकार अधिवेशन बहुमताच्या जोरावर गुंडाळणार आहे असा आरोप अजित पवार यांनी केला. आम्ही पहिल्यांदा मागच्या गुरुवारी विरोधीपक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याचे उत्तर अजुनही दिलेले नाही. उदयाला आमचा नवीन प्रश्न येईल. मंगळवारच्या प्रश्नावर चर्चादेखील सुरु झालेली नाही. आज लक्षवेधी ९ प्रकरणांच्या लागल्या. त्याच्यामध्ये कित्येक सन्मानिय विदर्भातील सदस्यांच्या आग्रही मागण्या होत्या. सध्या सभागृहामध्ये सिरियसपणा नाही. आजदेखील प्रश्न विचारला त्यावेळी त्या खात्याचे मंत्रीच सभागृहामध्ये नाहीत. मग संसदीय कामकाज मंत्री दिलगिरी व्यक्त करतात. वास्तविक विरोधकांच्या चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये हजर राहणे आवश्यक आहे. तो एक विरोधी पक्षाच्या नेत्याचा मान असतो. परंतु मुख्यमंत्रीसुद्दा हजर रहात नाहीत. ज्या खात्याची चर्चा असते त्या खात्याचे मंत्रीदेखील हजर नसतात. अशापध्दतीने सरकारचे संपूर्णपणे दुर्लक्ष सुरु आहे असा आरोप पवार यांनी केला. कामकाज समितीची बराचवेळ मिटिंग चालली .पण बहुमताच्या जोरावर आमची मागणी होती ती फेटाळून लावली. या सरकारला विदर्भातील जनतेला न्याय दयायचा नाहीय. प्रत्येकदिवशी या सरकारने उत्तर दिले आहे अधिवेशन संपायच्या आत मदत करणार. परंतु किती मदत करणार हे सांगितले नाही. आजपर्यंत एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक दिले नाही. अतिशय बेजबाबदार आणि दुर्लक्ष करणारे सरकार असून आम्ही त्यांचा निषेध करतो असेही अजित पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment