Wednesday 20 December 2017

जातीसाठी माती खा, पण एकत्र या- गणेश हलकारे



नागपूर येथे ओबीसी विद्यार्थी आणि युवकांचे महाअधिवेशन 


नागपूर,दि.20- तरुणांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुढे आले पाहिजे. उत्साह आणि समज यांची सांगड घातली गेली पाहिजे. सामाजिक प्रश्नांची जाण ठेवता आली पाहिजे. आरक्षणाची संकल्पना सर्वांना पटवून सांगता आली पाहिजे. ओबीसी बांधव आपल्याला सवर्ण मानत आल्याने मनुवाद्यांचे चांगलेच फावत आहे. गरज पडल्यास जातीसाठी माती खा, पण बाबांनो एकत्र तरी या आणि आपण ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहोत, याची जाण ठेवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत गणेश हलकारे यांनी नागपूर येथे केले.
ते नागपूरमध्ये कांग्रेसनगर येथील भाऊसाहेब डॉ़ पंजाबराव देशमुख सांस्कृतिक  सभागृहात आयोजित ओबीसी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवक-युवती यांच्या महाअधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे  होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे माजी राज्यमंत्री व आमदार विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्षपदी पूजा मानमोडे  या होत्या. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा़ डॉ़ बबनराव तायवाडे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार सुनील केदार, आमदार आशिष देशमुख,आमदार डॉ़ परिणय फुके,गिरीष पांडव,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, प्रा़ शेषराव येलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आरक्षणाच्या मुद्यावर पुढे बोलताना श्री हलकारे म्हणाले की, आरक्षण मागणाऱ्या जाती या मध्यम वर्गिय आणि सामान्य स्वरुपाच्या आहेत. मराठ्यांना सुद्धा आऱक्षण मिळाले पाहिजे. मनुवाद्यांनी जाती निर्माण केला तर आपण पोटजाती निर्माण केल्या. आपला पाच वर्षाचा इतिहास आहे. आपण तो जाणून घेतला पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुखांना समाजासाठी खूप हालअपेष्टा सोसल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आपल्यासाठी 340 कलमाची तरतूद केली. यासाठी संपूर्ण संविधान जरी वाचले नाही तरी पहिल्या पानावरून ते सहज लक्षात येते. संविधानाच संशोधने सुरू आहेत आणि आम्ही शांत आहोत. अधिवेशन आणि मोर्च्यांची जेवढी गरज आहे, त्यापेक्षा विधायक कामाची कामाची अधिक गरज असल्याचेही ते म्हणाले. ताराबाई शिंदे,  रुकमाबाई राऊत,सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ही नावे आपल्याला अद्यापही माहित नाही. वाचन संस्कृतीच आमची नाही. ओबीसींनी आतातरी पुस्तक घेऊन वाचली पाहिजेत, तरच आपण टिकू शकू, असे ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार डॉ.फुके यांनी ओबीसी समाजावरील अन्यायासाठी लढा सतत देत वस्तीगृहासचा प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना आशिष देशमुख म्हणाले, ओबीसी  विद्यार्थींच्या पाठिशी असून ओबीसीसाठी आम्ही लढत आहोत. मंत्रालयासाटी प्रयत्न आपल्या सहकार्याने झाले. आरक्षण मिळाले पाहिजे, विदर्भाच्या युवकांना २५ टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. परंतु, विपरीत परिस्थिती आहे.
याप्रसंगी मानिकराव ठाकरे म्हणाले,   जातपातीचे राजकारण सोडले पाहिजे. मराठा-मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीच्या अनेक जाती नोकरीपासून अद्यापही वंचित आहेत. आपल्यात एकजुट असणे गरजेचे आहे. क्रिमिलेयरच्या माध्यमातून फुट पाडण्याचे काम झाले. ओबीसी आयोग स्थापन करून त्याला घटनात्मक दर्जा असला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, म्हणाले घटनात्मक दर्जा ओबीसी आयोगीला असेल तरच त्याचा लाभ मिळेल.खासगीकरणातून आरक्षण बंद करण्याचा घाट आहे. बाहेरील विद्यापीठावरही नियत्रंण हवे.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की,  तरुणांच्या मेळाव्याला नवी दिशा देण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ करीत आहे.महासंघाच्या माध्यमातून ओबीसी आपल्या मागण्यांसाठी लढू लागला आहे. कृतीतून काम झाले पाहिजे, देखावा नको. जात धर्मापलीकडे जाऊन ओबीसीलढणार नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही. आठ लाखाचा जी आर निघाला, पण शैक्षणिक प्रतिपुर्तीचा जी आर कुठे आहे. तू हि़दू धर्मचा आहेस, असेसांगून आपली फसवणूक केली जात आहे. शेतीत राबणारा कुनबी, सुतार माळी अशा १८ पगड जातींना एकत्र आणण्याचे काम सुरू झाले. पण त्याचवेळी तोडण्याचे काम सुद्धा प्रचंड वेगाने सुरू आहे. ओबीसींची  जनगणना होत नाही. याप्रसंगी स्व. मुंडे साहेबांची आठवण होते. आज जो ओबीसींसाठीलढेल तो एक तर वर जाईल किंवा जेलमध्ये तर जाईलच जाईल. ओबीसींवर आत्महत्येची वेळ ज्यांनी आणली त्यालाच फासावर लटकवण्याची ताकद ठेवा.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...