Monday, 11 December 2017

ब्रिटिश काँसीलचे इंग्रजी विषयाचे तालुकास्तरीय चेस प्रशिक्षण ब्लॉसम शाळेत सुरु

देवरी:(11 डिसें) सुजित टेटे
ब्लॉक रिसर्च सेंटर (BRC) अंतर्गत ब्रिटिश काँसील चे चेस प्रशिक्षण ब्लॉसम शाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणाच्या उद्द्घाटन सोहळ्यात तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डी बी साकुरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी बी दिघोरे, प्रशिक्षणाचे प्रशिक्षक दिलीप मून आणि शाळेचे प्राचार्य सुजित टेटे मंचावर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण माध्यमिक शाळेच्या वर्ग 9 व 10 करीत इंग्रजी भाषे करिता आयोजित केले आहे. प्रशिक्षण पाच टप्प्यात घेण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण 34 माध्यमिक शाळेतील इंग्रजी शिक्षक प्रशिक्षणा साठी सज्ज झालेले आहेत. मान्यवरांनी सर्व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केला. सदर प्रशिक्षणाच्या यशा साठी बी आर सी चे यशवंत कावळे  आणि भरणे यांनी सहकार्य केला.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...