Monday, 4 December 2017

देवरीच्या विश्वजित निकोडेला मराठी वाङमयात स्वर्ण पदक

 देवरी:३(सुजित टेटे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या 104 व्या दीक्षांत समारंभात देवरी येथील विश्वजित गणपत निकोडे याला बी ए पदवीच्या मराठी वाङमयात स्वर्ण पदक प्राप्त झालेले आहे.एका मध्यम आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विश्वजित आपल्या अभ्यासाच्या दमावर सदर यश संपादन केले आहे. देवरी सारख्या नक्षल ग्रस्त आणि मागास बहुल भागातील विध्यार्थ्यांमध्येही स्वर्ण पदक पटकावण्याची क्षमता आहे हे यांनी सिद्ध केलेले आहे. विश्वजित एका खाजगी शाळेत मानधनावर काम करतो. आपल्या यशाचे श्रेय भाऊ विश्वाप्रित निकोडे आणि आई वडिलांना दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...