रांची ,दि.23- बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका खटल्यात रांची सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने आज (शनिवार) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांच्यासह 15 आरोपींना दोषी ठरवले. ती, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने निकाल दिला तेव्हा सर्व 22 आरोपी कोर्टात उपस्थित होते. दोषी ठरवण्यात आलेल्या लालूंसह 17 जणांना कोर्ट 3 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे.
कोर्टाने निकाल दिल्यानंतर लालूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी लालूंना कोर्टातून होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आणले आहे. दरम्यान, कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रांची पोलिसांनी बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता.
कोर्टाच्या निर्णयानंतर काही क्षणातच लालू यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवरून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. “भाजप जनतेमध्ये विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचे अत्यंत वाईट राजकारण करत आहे.’ असा आरोप करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment