साकोली,दि.18 : एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना साकोली पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे.
संदीपकुमार गजेसिंग (२८), प्रवीणकुमार गजसिंग (२४), सूरजमल तेलूराम (४०), रणवीरसिंह ग्यानीराम (४५) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ९८ हजार रुपये जप्त करण्यात आले. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून एटीएममध्ये येणाऱ्या लोकांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचे काम अनेक वर्षापासून करीत आहेत.
पोलिसांनी फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपासकार्य सुरु केले. सदर एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरुन या तिन्ही आरोपींची छायाचित्रे प्राप्त झाली.
त्यावरुन पोलिसांना या तरुणांचा माग काढणे सोपी गेले. साकोली पोलिसांनी सतत १४ दिवस तपासाची चक्रे वेगाने फिरवली. छत्तीसगढ पोलिसांनी दुर्ग येथे या तिन्ही आरोपींना गजाआड केले. बनावट एटीएमकार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लावल्याने या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
या कारवाईत पोलिस निरीक्षक रामेश्वर पिपरेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांच्यासह पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, किशोर मेश्राम यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment