Saturday 16 December 2017

जंगल वाचविणे हे आपले आद्य कर्तव्य- रामरतन राऊत

चिचगड,दि.१६- जंगलामुळे पर्यावरण सुरक्षित राहतो. प्राणवायू आणि पर्जन्यमान हे जंगलांच्या अस्तित्वावरच टिकून आहे. जंगले ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून जंगले टिकली तरच आपण टिकू, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. जंगल वाचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी आपण वृक्षतोड कमी करून इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार रामरतन राऊत यांनी चिचगड येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात केले.
चिचगड येथे वनविभागातर्फे अनुसूचित जातींच्या लाभाथ्र्यांना गॅस कनेक्शन आणि धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सविता पुराम या होत्या. मंचावर सरपंच कल्पना गोसावी, गोमती गॅसच्या संचालिका अर्चना नरवरे,वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप परिहार, वन परिक्षेत्राधिकारी काशिवार, वनक्षेत्र सहायक सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी २०० लाभाथ्र्यांना गॅस कनेक्शनचे वाटप उज्वला योजनेतून करण्यात आले. यावेळी लाभाथ्र्यांना धनादेशाचे सुद्धा वाटप करण्यात आले. प्रास्ताविक श्री. काशिवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पी टी मेश्राम यांनी केले. उपस्थितांचा आभार श्री डोये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व वनकर्मचाèयांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...