Tuesday 19 December 2017

उपअभियंता शर्मा यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार

गोंदिया,दि.१९ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे गोंदिया उपविभागाचे उपविभागीय अभियंता एस.आर.शर्मा यांच्याविरोधात नवेगावबांध येथील उपअभियंता एस.एस.चव्हाण यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सदर प्रकरण तिरोडा पोलीस ठाण्यात हंस्तातरीत करण्यात आले आहे.या तक्रारीत तिरोडा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसह इतर कामात अनियमितता बाळगल्याप्रकरणी गोंदिया उपविभागाचे उपविभागीय अqभयता एस.आर.शर्मा यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सदर तक्रारीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांचे पत्र १८ डिसेंबर २०१७ व चौकशी अहवाल १४ डिसेंबर २०१७ च्या आधारे संदर्भ देत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असतांना ५ पाणी पुरवठा नळ योजनेच्या निधी वितरणात ४१ लाख ५० हजार ४०४ रुपयाच्या निधीचा अपहार करुन योजनेच्या मुल्याकंनाचे खोटे दस्तावेज तयार केल्याचे म्हटले आहे.उपविभागीय अभियंता शर्मा यांच्यावर तिरोडा तालुक्यातील बेरडीपार,सोनेखारी,लोणारा,सितेपार व कोयलारी या ५ नळ पाणीपुरवठा योजनेसाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यानुसार चौकशीत सदर उपअभियंता यांनी अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.त्यामुळे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत नमुद करण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यात आल्याचे तक्रारकर्ते उपविभागीय अभियंता एस.एस.चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.त्या तक्रारीनुसार तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांनी दिली.
दरम्यान उपअभियंता शर्मा यांची याबाबत प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपणास यासंदर्भात असे कुठलेही पत्र मुकाअ किंवा कार्यकारी अभियंता यांच्याकडून मिळालेले नाही.त्यातच कार्यकारी अभियंता असतांना उपअभियंता चव्हाण यांच्यामार्फेत तक्रार दाखल करण्यात आल्याने याप्रकरणात कुठेतरी मला फसविण्यासाठीच हा प्रकार केला गेलेला असल्याचे सांगितले.चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता पद मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नात ते अपयशी ठरल्यानेच त्यांच्यामार्फेत मला फसविण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत आपण याबाबत लवकरच प्रशासकीय बाबींचा विचार करुन भूमिका स्पष्ट करु असे सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...