
आमगाव,दि.21: आमगावं तालुक्यातील तिगावं येथे भाजप, बसप,आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातील 45 युवा कार्यकर्त्यानी गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महसचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसमध्ये आज गुरूवारी (दि.21) प्रवेश केला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा कांग्रेस चे महासचिव सहषराम कोरोटे हे होते. या प्रसंगी देवरी-आमगावं विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, आमगाव तालुका कांग्रेसचे महासचिव गणेश हुकरे, तालुका युवक कांग्रेसचे महासचिव नरेश बोपचे, सहसचिव हंसराज जोशी, कोशाध्यक्ष प्रल्हाद गाते, देवरी तालुक्यातील कांग्रेस कार्यकर्ते छगनलाल मुंगनकर, सुधाकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment