Thursday, 14 December 2017

महाराष्ट्राला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाचे तीन पुरस्कार

नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्रातील चंद्रपुर, औरंगाबाद आणि नागपूर येथील ऊर्जा प्रकल्पांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा दक्षता ब्युरोच्यावतीने  ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’ चे औचित्त साधून कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. यावेळी ऊर्जा संवर्धन पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री राकेश सिंग यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जीएमआर वरोरा ऊर्जा केंद्र या औष्णिक ऊर्जा प्रकल्पास प्रथम क्रंमाकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने मोठया प्रमाणात ऊर्जेची बचत केलेली आहे. परिवहन क्षेत्रातील श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील एन्डूर्रन्स टेक्नॉलॉजी मर्यादीत या ऑटोमोबाईल कंपनीला प्रथम क्रंमाक प्राप्त झाला. राष्ट्रीपती यांच्या हस्ते हा पुरस्कार युनिटच्या उपाध्यक्षाने स्वीकरला. या युनिटने 127 लाख रूपयांच्या ऊर्जेची बचतकेलेली आहे.उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये व्दितीय पुरस्कार नागपूर जिल्ह्यातीलमौदा येथील सुपर औष्णिक ऊर्जा केंद्र प्रकल्पाला प्राप्त झाला. हापुरस्कार केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्रकल्प समुहाचे महाव्यवस्थापक राजकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या युनिटने वर्षभरात 405 लाख रूपयांची ऊर्जेची बचत केली.Facebook

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...